शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष असून तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये निवडणूक आयोगामुळे स्थापन झालेला आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाने मुख्य शिवसेनेपासून वेगळे असे नवे चिन्ह दिले होते, कारण इ.स. २०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून मुख्य शिवसेनेत दुफळी निर्माण झाली होती, त्यामुळे तात्पुरता मुख्य शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन गटांचे दोन स्वतंत्र पक्ष निर्माण करण्यात आले होते, पैकी दुसरा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना हा होय.
पक्ष-चिन्ह वाद
1.शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नांव आणि निवडणूक चिन्ह म्हणून मशाल दिले होते, ज्यावर समता पक्षच्या शीर्ष नेतृत्वाने आपले मूळ चिन्ह असल्याचा दावा केला आहे.
2.समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्हासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु तिथे याचिका फेटाळली गेली.
3.तद्नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, परंतु धगधगती मशाल हे चिन्ह ठाकरेंनाच मिळाले.
4.एसंशिं गटाच्या धनुष्यबाण चिन्हाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित.
शिवसेनेचा इतिहास
click here
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) | Official Website
click here
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
click here