मतदार बंधू-भगिनींनो…
माझा आपल्याला क्रांतिकारी नमस्कार!
सौ. तुळसी भिमराव मरसाळे
प्रभाग क्रमांक २२ (अ)
महिला राखीव जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून
तुमच्यासमोर उभी आहे!, आज राजकारणासाठी नाही…
तर सत्य, सेवा आणि स्वाभिमानासाठी तुमच्यासमोर उभी आहे!
नाशिक हे शहर केवळ शहर नाही… ही आहे रामभूमी,
महापुरुषांच्या विचारांनी घडलेली, संघर्षातून उभी राहिलेली,
आणि अन्यायाविरुद्ध नेहमी लढणारी पवित्र भूमी!
देवळालीगाव… विहीतगाव… वडनेर पंचकोशी…
हे नावं नुसती नकाशावरची नसून स्वाभिमानाची
व सामाजिक परिवर्तनाची आहे .या पंचकोशीला घडवणारे
स्वर्गीय बाळासाहेब देशमुख, केशवराव थोरात, दयाकाका हांडोरे,
शांताराम बापू कदम यांच्या कार्यामुळेच आज आपली ओळख आहे!
त्यांचे विचार आजही आपल्या मनात आहे.
⏰ ही वेळ बदलाची आहे!
⏰ ही वेळ इतिहास घडवण्याची आहे! ही वेळ आहे
👉 अनुसूचित जाती
👉 कर्तृत्ववान महिलेला
नेतृत्वाची संधी देण्याची!